श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री अनुसया माता मंदिर परिसरात देवस्थानावर सोडलेल्या लंगड्या गाईची शिकार पट्टेदार वाघाने करून गाईस ठार केल्याची घटना दि 2 रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास घडल्याने गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरली आहे
देश-विदेशातून येत असलेले अनेक भाविक भक्त मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया माता संस्थांनवर नवस फेडण्यासाठी जनावरे दान देत असतात अशीच एक गाय श्रीदत्त शिखर संस्थांनवर सोडण्यात आली होती अज्ञात वाहनाने तिला धडक देऊन तिचे पाय मोडल्याने अनेक दिवसांपासून ती लंगडत दोन्ही देवस्थानाच्या मधील जंगलात चरत फिरत होती
माहूर तालुक्याला लागूनच पैनगंगा अभयारण्य असल्याने येथे अनेक वाघ व बिबटे आहेत यापैकी अनेक वाघ बिबटे माहूर तालुक्यातील जंगलात येऊन जनावरांचा फडशा पाडत असतात दि 2 रोजी सायंकाळी अनेक वाहनधारकांना या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते सायंकाळी श्री अनुसया माता मंदिराच्या समोरील पार्किंग मध्ये गाय एकटीच फिरत होती त्यामुळे पट्रेदार वाघाने तिच्यावर झडप घालून गाईला पार्किंगला लागून असलेल्या दरीत फेकले दरीत जाऊन तिला पन्नास ते साठ मीटर ओढत नेऊन जंगलात तिचा फडशा पाडला घटना अनेक नागरिकांनी बघितली परंतु त्यांची वाघाला बघून पाचावर धारण बसल्याने त्यांनी तेथून पळ काढल
नागरिकांनी घटना वन विभागाला कळविली परंतु माहूरच्या जंगलात वाघ नाहीच अशा भूमिकेवर ठाम असलेला वनविभाग अशा घटनांना कधीच प्रतिसाद देत नाही मेलेल्या गाईचा वास सुटला असून वाघा आल्याची चर्चा तसेच गाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने स्थानिक व्यापारी नागरिक आणि येणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरलीआहे वाघाने माहूर शहरात इंट्री केल्यास गंभीर घटना घडू शकते त्याआधी वन विभागाने तात्काळ माहूर तालुक्यातील जंगलात फिरणारे बिबटे वाघ यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

COMMENTS