यशवंत ' मध्ये माय भारत उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न*

दिनांक:(३ ऑगस्ट २०२६)                भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "न...


दिनांक:(३ ऑगस्ट २०२६)

               भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा – विकसित भारत अभियान" अंतर्गत जिल्हा युवा अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

                उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. डी. पी. सावंत (माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड) हे होते.

               अध्यक्षीय समारोपात त्यांनी, युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुदृढ, सजग आणि व्यसनमुक्त युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन केले.

               कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रत्नदीप गायकवाड (अपर जिल्हाधिकारी, नांदेड) यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मनोगतात त्यांनी, युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

               प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत आणि युवक विकासाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना होते. युवकांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी जनजागृतीचे कार्य सातत्याने करावे, असे आवाहन केले. 

               याप्रसंगी समाजसेवक श्री. कैलास गायकवाड उपस्थित होते.  

              प्रास्ताविक शु. श्री. अशनी कानकटे (माय भारत, जिल्हा युवा अधिकारी, नांदेड) यांनी केले. त्यांनी माय भारत उपक्रमाची उद्दिष्टे, नशामुक्त युवा – विकसित भारत अभियानाची संकल्पना तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट केले. युवकांमध्ये सर्जनशीलता, आणि जाणीव आणि जागृती वाढविण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

               उद्घाटन समारंभानंतर दोन सत्रांमध्ये विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व/वादविवाद, घोषवाक्य लेखन, रील व लघुपट निर्मिती, पथनाट्य आणि स्लॅम पोएट्री या आठ स्पर्धांचा समावेश होता. नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक स्पर्धेत व्यसनमुक्ती, युवक सक्षमीकरण आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित प्रभावी संदेश देण्यात आला.

               दिवसभर चाललेल्या स्पर्धांनंतर सायंकाळी बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

               कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अभिनंदन इंगोले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

               या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये व्यसनमुक्ती, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रप्रेम आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून, "नशामुक्त युवा – विकसित भारत" या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group