साखरेचे दर वाढले मग उसाचे का नाही? नांदेड : साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने साखर मराठवाड्यातील कारखानदारांनी RSF (आर.एस.एफ.) नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर किमान पाचशे रुपये तरी द्यावेत. पश्चिम महाराष्ट्रात सोमेश्वर साखर कारखान्याने 4000 रुपये दर देऊन चांगली सुरुवात केली आहे मराठवाड्याचे मोठे नेते भाऊराव कारखान्याचे सर्वेसर्वा अशोकराव चव्हाण यांनी याबाबत पुढाकार घेऊन RSF चे प्रतिटन पाचशे रुपये देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व साखर कारखानदारासमोर एक आदर्श निर्माण करावा अशी मागणी उसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.
राज्यातील साखर कारखाने साखरेचे दर कमी झाले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षाही कमी दर देतात . यंदा साखरेचे दर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांनी वाढले आहेत तरीपण राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त ऊस दर दिला नाही. अनेक साखर कारखाने कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम सुद्धा थकवलेली आहे अशा कारखान्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी तसेच ज्या कारखान्यांनी रडत पडत एफ आर पी ची पूर्तता केली. वर्षानुवर्ष साखरेचे दर कमी असल्याचे कारण देत कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच कमी दर देत आले आहेत यावर्षी साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने कारखानदारांनी कारखानदारांनी वाढलेल्या साखर दराचा लाभ शेतकऱ्यांनाही द्यावा यासाठी एफ आर पी अधिक किमान पाचशे रुपये अतिरिक्त दर द्यावा अन्यथा सर्वपक्षीय शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभे करण्याचा इशारा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

COMMENTS