माहूर ( प्रतिनीधी)माहूर तालुक्यातील खेड्यापाड्यात हातभट्टी दारू अड्डे नष्ट करण्याच्या जबरी कारवाया होत असताना नवनवीन दारू गाळपणारे उदयास येत असल्याने पोलिसांनीही कंबर कसली असून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आती दुर्गम भागातील कसारपेठ आणि मौजे कुपटी येथे दारू गाळपण्याच्या तयारीत असलेल्या घर गोठ्यावर धाड टाकून हजारो रुपयांचे मोहफूल व रसायन तसेच शिंदि दारू नष्ट केल्याच्या दोन घटना दि 20 रोजी दुपारी 12:30 वाजता घडल्या आहेत
विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध सतत धाडसत्र राबवीत आहेत मौजे कासारपेठ येथे हातभट्टी लावण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वत येथील एका शेतात असलेल्या गोठ्यावर धाड टाकली असता येथे मोहफूल बनवण्याचे रसायन व साहित्य एकूण मुद्देमाल 4 हजार रुपयाचा नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी बालाजी राठोड यांचे सह होमगार्ड उपस्थित होते तर मौजे कूपटी येथील एका घरात मोहफूल आणि रसायन असे 10 हजार रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले तर दुसऱ्या एका घरात केमिकलद्वारे बनविण्यात आलेली शिंदि दारू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका प्रकाश गेडाम ज्ञानेश्वर खंदाडे यांनी येथे धाड टाकून 5 हजार रु ची शिंदी दारू सह रसायन साहित्य नष्ट करून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
हातभट्टी दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागत असल्याने दारू गळपणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत केमिकल पासून शिंदी दारू बनवून विक्री करण्याचा नवीन फंडा सुरू केल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे सह पोलिसांनी खबर लागताच धाडी टाकण्याचे सत्र सुरू केल्याने हातभट्टी शिंदी सह अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत

COMMENTS