नांदेड : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रप्रेरणादायी गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी अर्ब...
नांदेड : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रप्रेरणादायी गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘वंदे मातरम्’ सामूहिक गायन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,सचिव रविंद्र रगटे,संचालक प्रा.सुरेश कटकमवार,वर्षा देशमुख,साहेबराव मामिलवाड,वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख उपस्थित होते.
मुख्यालयात सायंकाळी ठीक ५ वाजता राष्ट्रभक्तीच्या वातावरणात सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ गायन करून मातृभूमीप्रती कृतज्ञता आणि राष्ट्रनिष्ठेची भावना व्यक्त केली.
यावेळी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक गायन उपक्रमामुळे कर्मचारी व सदस्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
यावेळी उपसरव्यवस्थापक विजय शिरमेवार,विपणनन अधिकारी महेश केंद्रे,उपव्यवस्थापक प्रशांत कदम,मुख्यशाखेचे शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे,सिडको शाखेचे शाखा व्यवस्थापक गजानन पाटील,चिखलवाडी शाखेचे शाखा व्यवस्थापक उमाकांत जंगले यांच्यासह मुख्यालय व नांदेड शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS