बिलोली प्रतिनिधी खतगावकर महाविद्यालयात तिरंगा रॅलीचे आयोजन * बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महा...
बिलोली प्रतिनिधी खतगावकर महाविद्यालयात तिरंगा रॅलीचे आयोजन
* बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तिरंगा रॅली व परिसर स्वच्छता उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटोदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हातात तिरंगा ध्वज घेऊन स्वयंसेवकांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय हिंद” अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पुरभाजी भुमरे व डॉ. बालाजी डाकोरे यांनी या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले. त्यांनी स्वयंसेवकांना सोबत घेऊन देशभक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रॅलीनंतर महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.
या उपक्रमात महाविद्यालयातील प्रो. हेमंत बक्षी, प्रो.शरद देगलूरकर, प्रो अनिल माने, प्रो राजेंद्र शिंदे, प्रो .दयानंद माने, डॉ. चंद्रकांत गजेवाड, डॉ. सुनील कदम, डॉ. गोविंदराव पांचाळ, प्रो शंकर लेखणे, डॉ. आईलवार, प्रा. शिवांजली वारले, डॉ. बाळासाहेब चट्टे, प्रा. आरती अटकोरे, डॉ. विलास वानखेडे, प्रा अनुजा रानवळकर, प्रा श्रद्धा लामतुरे, प्रा संजय देगावकर, प्रा पेंटे, प्रा मारुती सोनकांबळे, प्रा वानोळे, प्रा कोणमारे, डॉ शेख सर, डॉ चिंतले,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर स्वच्छता उपक्रमातून “स्वच्छ परिसर हीच निरोगी समाजाची ओळख” हा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील साईनाथ बावणे, वैभव जांभळे सर्वांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमातून देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडून आला.

COMMENTS