नांदेड : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा धनगर समाजाचे नेते व्यंकटराव मोकले यांच्या पत्नी सौ. संगिता व्यंकटराव मोकले यांचे पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दीर्घ आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५४ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मोकले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच धनगर समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. संगिता मोकले या प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आजारासाठी उपचार सुरू होते. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती व्यंकटराव मोकले, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
सौ. संगिता मोकले यांच्या नाईकनगर , नांदेडच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्यावर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता शांतिधाम, गोवर्धन घाट, नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

COMMENTS