धर्माबाद - येथील माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड यांची मन्नेरवारलु समाजाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी मन्नेरवा...
धर्माबाद - येथील माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड यांची मन्नेरवारलु समाजाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी तोटलोड यांनी केलेल्या निःस्वार्थ कार्याची, समाजाप्रती असलेल्या निष्ठेची व संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांची आदिवासी मन्नेरवारलू महासंघामध्ये धर्माबाद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाचा उपयोग समाजहित, संघटन, बळकटी, युवक-युवती, महिला, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी तथा सर्व घटकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे हे कार्य करतील, असा दृढ विश्वास महासंघाला यांच्याकडून आहे. गंगाधर तोटलोड हे 20 वर्षांपासून समाज कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी वर्ष 2005 ते 2015 पर्यंत अतकुर गावचे उपसरपंच व जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2012 ते 2017 पर्यंत काम पाहिले. सध्या ते धर्माबाद येथील काॅग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.

COMMENTS