राम दातीर माहूर( प्रतिनिधी)लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या...
राम दातीर
माहूर( प्रतिनिधी)लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य सिमेंट रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. मोठ्या दाव्यांसह तयार करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उघडी पडली असून, रस्त्याची अक्षरशः 'चाळण' झाली आहे. यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लाखो रुपये खर्च करून भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी हा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सिमेंटचा वरचा थर पूर्णपणे उखडला असून आतील खडी बाहेर आल्याने अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.
सिमेंट उखडल्यामुळे दुचाकी चारचाकी चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे चित्र निर्माण झाले आहेत.दररोज शेकडो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र सिमेंट रस्त्यावरील या खडतर प्रवासामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.सिमेंट रस्ता टिकेल या अपेक्षेने तयार करण्यात आला होता मात्र काही वर्षातच या रस्त्याची चाळण झाली आहे.या सिमेंट रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे संबंधित कंत्राटदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची तत्काळ दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.

COMMENTS