क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या नॅनो-ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला पेटंटची मान्यतास्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ...
क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या नॅनो-ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला पेटंटची मान्यतास्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलाच्या संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या प्रभावी वितरणासाठी विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण नॅनो-स्ट्रक्चर्ड ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.“Nanostructured Delivery Device for Poorly Water-Soluble Anti-Tubercular Drugs and Method Thereof” या नावाने या संशोधनास पेटंट मंजूर झाले असून, पेटंटचा कालावधी २० वर्षांचा आहे. या संशोधनाचे पेटंटधारक व संशोधक म्हणून डॉ. सुरेंद्र जी. गट्टानी, स्वप्नील पाटील आणि प्रदीप निरभवणे यांची नोंद आहे.
कमी पाण्यात विरघळणाऱ्या क्षयरोगविरोधी औषधांच्या शरीरातील औषध-वितरण प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नॅनो-स्ट्रक्चर्ड ड्रग-डिलिव्हरी पद्धतीचा या संशोधनात वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे औषधांची प्रभावीपणे शरीरात पोहोच वाढविण्यास तसेच त्यांच्या उपचारात्मक परिणामकारकतेत सुधारणा करण्यास संभाव्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आधुनिक औषध-वितरण प्रणालीच्या क्षेत्रात हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर आणि औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. पेकमवार यांनी डॉ. सुरेंद्र गट्टानी व त्यांच्या सह-संशोधकांचे अभिनंदन केले. त्यांच्या संशोधनातून औषधनिर्माणशास्त्र, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या पेटंटमुळे औषधनिर्माणशास्त्र संकुलाची संशोधनातील उत्कृष्टता, नवोपक्रम, बौद्धिक संपदा निर्मिती आणि आधुनिक औषध-वितरण तंत्रज्ञानाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच या यशामुळे विद्यापीठातील शिक्षक व संशोधकांना आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण व उपयोजित संशोधन करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
विद्यापीठाच्या संशोधन परंपरेत भर घालणारे हे पेटंट म्हणजे नांदेडच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, औषधनिर्माणशास्त्रातील विद्यापीठाच्या वाढत्या संशोधन क्षमतेचे हे द्योतक मानले जात आहे.

COMMENTS