नांदेड : पीपल्स हायस्कूल, नांदेडच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला....
नांदेड : पीपल्स हायस्कूल, नांदेडच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहाल सिंघ जहागीरदार हे होते. पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच नांदेडचे प्रसिद्ध हॉकीपटू प्रा. डॉ. सरदार जुझारसिंग सिलेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. सिलेदार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व आणि खेळातून मिळणाऱ्या संधींची माहिती दिली. स्पर्धेत यश मिळवून देशाचे नाव उंचावता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबदल्याचा विचार न करता खेळाच्या मैदानात उतरून मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळावे, असे आवाहन त्यांनी केले. विविध उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्राचार्य सुकाळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करत असताना जागीरदार सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच सौ. बच्चेवार आणि श्रीमती कंधारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. यावेळी आवटे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालेपवाड यांनी केले, तर फुलारी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS