पत्रकारितेची विश्‍वासार्हता टिकविणे हीच लोकशाहीची खरी ताकद : विलास बडे

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या नांदेड येथील कॅडर कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद नांदेड/प्रतिनिधी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारितेने के...


व्हॉईस ऑफ मीडिया’च्या नांदेड येथील कॅडर कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

नांदेड/प्रतिनिधी

सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारितेने केले आहे. मात्र आज सामान्य माणसाचा पत्रकारितेवरील विश्‍वास कमी होत असेल, तर त्यामागील कारणांचा पत्रकारांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पत्रकारितेची विश्‍वासार्हता धोक्यात येणे ही केवळ पत्रकारांची समस्या नसून, ती लोकशाहीसमोरील मोठी चिंता आहे, असे प्रतिपादन न्यूज 18 मराठी चे सहयोगी संपादक विलास बडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.बालाजी कल्याणकर, न्यूज 18 मराठीचे सहयोगी संपादक विलास बडे, व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय चिफ गगनकुमार महोत्रा, राष्ट्रीय संघटक सारीका पन्हाळकर, मराठवाडा अध्यक्ष तथा पालकसचिव डॉ.गणेश जोशी, आंतरराष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, प्रदेश अध्यक्ष विजय चोरडीया आदिंची उपस्थिती होती.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नांदेड येथे आयोजित मराठवाडा विभागीय एकदिवसीय कॅडर कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना विलास बडे बोलत होते. पत्रकारितेचे बदलते स्वरूप, माध्यमांची विश्‍वासार्हता, ग्रामीण पत्रकारांसमोरील आव्हाने, सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव, फेक न्यूज, टीआरपीची स्पर्धा आणि पत्रकारांनी स्वीकारावयाची नवी भूमिका यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

पुढे बोलतांना बडे म्हणाले की, पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे. समाजात काय घडत आहे, व्यवस्थेत कुठे चुका होत आहेत, सामान्य माणसाच्या कोणत्या समस्या आहेत आणि सत्ताधार्‍यांकडून कुठे चूक होत आहे, हे निर्भीडपणे दाखवून देण्याचे काम पत्रकारितेचे आहे. पत्रकारिता केवळ एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी किंवा सत्तेच्या बाजूने उभे राहण्यासाठी नसून, प्रश्‍न विचारणे हा पत्रकारितेचा धर्म आहे.

मुक्त पत्रकारिता नसेल तर समाज अंध होतो. प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज ऑरवेल यांच्या विचारांचा संदर्भ देत विलास बडे यांनी पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट केले. लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार आणि सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारिता आवश्यक आहे. जनतेला जागृत करणारी मुक्त पत्रकारिता ही नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता नसेल, तर समाजासमोर सत्याचा आरसा राहणार नाही आणि समाज अंध होण्याचा धोका निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

कॅम्पमध्ये मार्गदर्शन करताना व्हॉईस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय चीफ गगन महोत्रा म्हणाले पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या वेगवान युगात पत्रकारांनी केवळ पारंपरिक माध्यमांवर अवलंबून न राहता डिजिटल माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संवादप्रणालींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेला चांगले दिवस आणायचे असतील, तर पत्रकारांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. बदल स्वीकारणारी पत्रकारिताच भविष्यात अधिक सक्षमपणे उभी राहील, असे गगन महोत्रा यांनी सांगितले.

यावेळी देशाच्या राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर यांनी विकसित पत्रकारितेची संकल्पना स्पष्ट करताना पत्रकारितेच्या विकासासाठी नवीन विचार, कौशल्यवृद्धी आणि बदलत्या काळानुसार ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विकसित पत्रकारितेचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असेल, तर आजपासूनच ठोस आणि सकारात्मक पावले उचलावी लागतील, असे सारिका पन्हाळकर यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी जगभरात सुरू असलेले काम कसे चालते हे समोर ठेवले. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकारांच्या हितासाठी आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर संघटितपणे काम करण्याबरोबरच त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ठोस उपक्रम राबविण्यावर संघटनेचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी कॅडर कॅम्पच्या व्यापक आयोजनाची माहिती दिली.

या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी आयोजन करण्यात आले आहे. कॅडर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि राज्यस्तरीय नेतृत्व एकजुटीने काम करत असून, त्यांच्या मेहनतीमुळे नांदेडमध्ये संघटनात्मक शक्तीचे प्रभावी दर्शन घडत आहे.

या कॅडर कॅम्पमध्ये प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, नांदेडचे अध्यक्ष तुकाराम सावंत, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, परभणीचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, लातूरचे जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव आणि बीडचे जिल्हाध्यक्ष जालिंदर धांडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी केले.

तसेच राज्याचे सरचिटणीस गजानन देशमुख, सहसरचिटणीस श्रीनिवास भोसले, मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे आणि मराठवाडा सरचिटणीस सुनील जोशी, जिल्हा सहसचिव सुरेश आंबटवार, संभाजी सोनकांबळे, उत्तर जिल्हाध्यक्ष संगमेश्‍वर बाचे, शरद काटकर, डॉ.प्रविणकुमार सेलूकर, डॉ.भगवान सुर्यवंशी, प्राध्यापक राज गायकवाड, शेख याहीया, चद्रभान सुर्यवंशी, किशोर वाघदरीकर, संजय साळवे, पवनकुमार पुठेवाड, भास्कर डोईबळे, मिलींद बचाव यांच्यासह अनेक पदाधिकारी या कॅडर कॅम्पच्या यशासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार कल्याणकर म्हणाले की, बर्‍याचदा पत्रकारांकडून नकारात्मक बातम्या दिल्या जातात. मात्र, एखाद्या लोकप्रतिनिधीने काम केले नसेल, तर अशा बातम्या पत्रकारांनी निश्‍चितपणे मांडाव्यात. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या कामाबाबतची वस्तुस्थिती समजण्यास मदत होते आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी त्यांना दिशा मिळते. पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबतही आमदार कल्याणकर यांनी भूमिका मांडली. पत्रकारांच्या महामंडळाचा प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित असून, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group