नांदेडच्या ऐतिहासिक जुना मोंढा टॉवरची दुर्दशा! भिंतीवर उगवली झाडे, महापालिकेचे दुर्लक्ष; रात्री मद्यप्यांचा अड्डा ग्लोबल मराठवाडा न्युज नेटव...
कामगारांचा आधार आणि ऐतिहासिक महत्त्व एकेकाळी घड्याळ ही दुर्मीळ वस्तू असताना, जुना मोंढा येथील टॉवरवर लावलेले हे भव्य घड्याळ मोंढ्यातील हजारो कामगारांसाठी वेळेचे मुख्य साधन होते. दर तासाला होणाऱ्या टॉवरच्या टोलच्या (आवाज) आवाजावरून कामगार आपली कामाची व जेवणाची वेळ ठरवत असत. याशिवाय राजकीय व सामाजिक चळवळींचा केंद्रबिंदू म्हणून या ऐतिहासिक टॉवरकडे पाहिले जाते. आजही हे घड्याळ सुरू असले, तरी त्याच्या देखभालीकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे.
झाडांमुळे भिंतींना तडे, वास्तूला धोका! सध्या टॉवरच्या शिखरावर आणि वरच्या भागात पिंपळ व लिंबाची मोठी झाडे उगवली आहेत. या झाडांची मुळे खोलवर गेल्यामुळे ऐतिहासिक टॉवरच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. यामुळे ही ऐतिहासिक वास्तू कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. तात्काळ ही झाडे तोडून टॉवरची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.रात्री मद्यप्यांचा अड्डा, परिसरात घाणीचे साम्राज्य महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे टॉवर परिसरात रोज रात्री समाजकंटक आणि मद्यपींचा वावर वाढला आहे. परिसरात सगळीकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि कचरा पसरलेला दिसून येत आहे. नांदेडच्या सौंदर्याला बाधा आणणारा हा प्रकार रोखण्यासाठी मनपाने येथे नियमित साफसफाई व सुरक्षा व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
नांदेडच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करा, अन्यथा तीव्र आंदोलन: विक्रम पाटील बामणीकर
"जुना मोंढा टॉवरवर उगवलेली झाडे तात्काळ हटवून टॉवरची डागडुजी करण्यात यावी आणि परिसरात दररोज नियमित साफसफाई करण्यात यावी. अवैध मद्यप्राशनाला आळा घालून ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे," या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनावर छावा मराठा युवा महासंघाचे विक्रम पाटील बामणीकर यांची स्वाक्षरी आहे.


COMMENTS