सीसीटीव्ही आणि गुप्तहेर जाळ्याच्या मदतीने दोन आरोपी गजाआड; मूळ मालकाला घोडा सुपूर्द नांदेड: शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक...
सीसीटीव्ही आणि गुप्तहेर जाळ्याच्या मदतीने दोन आरोपी गजाआड; मूळ मालकाला घोडा सुपूर्द
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी डॉक्टर राघवेंद्र शिवाजीराव कुलकर्णी (वय ३९, रा. रविनगर, नांदेड) यांचा अंदाजे ८०,००० रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा दिनांक १९ जून २०२६ रोजी रात्री जिरायत मैदान परिसरातून चोरीला गेला होता. या संदर्भात डॉ. कुलकर्णी यांनी २ जुलै २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
तंत्रज्ञान आणि गुप्तहेरांच्या माहितीमुळे आरोपी गजाआड
गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी शेख अदिन शेख यासीन (वय २० वर्ष, रा. लेबर कॉलनी, नांदेड) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा घोडा जप्त करून डॉक्टर कुलकर्णी यांच्या स्वाधीन करण्यात आला. आपला लाडका घोडा परत मिळाल्यामुळे मालकाने पोलिसांचे जाहीर आभार मानले आहेत.
या पोलीस टीमने बजावली कामगिरी:
सदरची यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख, पोलीस कर्मचारी विशाल माळवे, अदनान पठाण, विष्णुकान्त मुंडे, राजीव घुले, राहुल लाठकर, नागनाथ चापके, सुधाकर मरदोडे आणि अंकुश कांबळे यांनी केली आहे.
नांदेड: शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या दोन दिवसांत चोरीला गेलेला ८० हजार रुपये किमतीचा महागडा 'मारवाडी जातीचा घोडा' हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, घोड्याला सुखरूप त्याच्या मूळ मालकाच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तो हस्तगत केलेला घोडा व त्याचे मालक दिसत आहेत.
जिरायत मैदानावरून झाली होती चोरीयाबाबतची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी डॉक्टर राघवेंद्र शिवाजीराव कुलकर्णी (वय ३९, रा. रविनगर, नांदेड) यांचा अंदाजे ८०,००० रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा दिनांक १९ जून २०२६ रोजी रात्री जिरायत मैदान परिसरातून चोरीला गेला होता. या संदर्भात डॉ. कुलकर्णी यांनी २ जुलै २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

COMMENTS