नांदेड/ प्रतिनिधी - तब्बल सहा महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी होणार आहे. या बैठकीच्या नियोजनासा...
नांदेड/ प्रतिनिधी - तब्बल सहा महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी होणार आहे. या बैठकीच्या नियोजनासाठी पालकमंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी मुकेश बारहाते आले असून त्यांनी मागील पाच दिवसापासून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने यांच्या कक्षाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे विशेष कार्य अधिकारी आत आणि जिल्हा नियोजन अधिकारी हे कक्षाच्या बाहेर बसून काम करत असल्याचे चित्र दिसत आहे.
विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनामुळे रखडलेली नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी होणार आहे. या निमित्ताने पालकमंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी मुकेश बारहाते मागील पाच दिवसापासून नांदेडमध्ये आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नियोजनाची प्रमुख जबाबदारी नियोजन अधिकाऱ्यांची असते. परंतु पालकमंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी बारहाते यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये ठाण मांडले असून त्यांचे खाजगी लोकांसोबत विशेष कार्य चालू असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या कक्षाचा ओएसडी मुकेश बारहाते यांनी ताबा घेतल्याने नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने यांना मात्र कक्षाच्या बाहेर बसून काम करावे लागत आहे. सदर प्रकार जिल्हा नियोजन भवन व जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याचे प्रत्यक्षदर्शी बोलत आहेत.

COMMENTS