मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी धरण प्रकल्पाच्या परिसरात सुमारे तीन हजार ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आल्याचा...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी धरण प्रकल्पाच्या परिसरात सुमारे तीन हजार ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या अवैध साठ्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या ४० वर्षांपासून लेंडी धरणाचे काम सुरू असून, सध्या हे काम ९५ टक्के पूर्णत्वास पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम करणाऱ्या मागील कंत्राटदाराने १३ मे रोजीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन आपले काम पूर्ण झाल्याचे कळवले होते, त्यानंतर प्रकल्पाचे काम नवीन कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले. मात्र, काम पूर्ण होऊनही संबंधित कंत्राटदाराच्या सिमेंट प्लांटजवळ मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा कसा आणि कोणाच्या परवानगीने जमा करण्यात आला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, धरण परिसरातील ही वाळू केवळ पडून न ठेवता ती गरजू लोकांसाठी वापरली जावी. यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे की; लेंडी प्रकल्पाच्या पुनर्वसन भागातील बांधकामे करणाऱ्या नागरिकांना आणि 'प्रधानमंत्री आवास योजने'तील घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार प्रत्येकी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS