नांदेड़ दि. 10 जुलै : सध्या देशभरात राष्ट्रीय अभियान जनगणना (एस. आय. आर.) अंतर्गत नोंदणी करण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. गुरुद्वारा प्रभाग नं. ...
नांदेड़ दि. 10 जुलै : सध्या देशभरात राष्ट्रीय अभियान जनगणना (एस. आय. आर.) अंतर्गत नोंदणी करण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. गुरुद्वारा प्रभाग नं. 17 येथील नगर सेवकांनी संयुक्तरितिया प्रयत्न करुन नागरिकांच्या सोयींसाठी नोंदणी करण्याचे दोन दिवसीय शिबीर घेण्याबाबत प्रयत्न केले. त्यानुसार नांदेड़ वाघाला शहर महानगर पालिका आणी येथील सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड यांच्या संयुक्त माध्यमात दि. 11 जुलै आणी दि. 12 जुलै 2026 दोन दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बडपुरा गुरुद्वारा गेट नं. 4 ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान हे शिबीर असेल. नागरिकांनी जन्म दिनांक दाखला, रहीवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका कुंजीवाले मनप्रीतकौर अमरजीतसिंघ, श्रीमती प्रभा बाई यादव, स. गुरुमीत सिंघ नवाब (डिंपल) आणी श्री सुमित प्रकाश मुथा यांनी केले आहे.

COMMENTS