नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे गीता परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. ...
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे गीता परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ. प्रवीण पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. सदिच्छा सोनी, सभापती, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती, नांदेड-वाघाळा महानगरपालिका,
स. नौनिहाल सिंग जहागीरदार (अध्यक्ष, शालेय समिती), ॲड.कॉ. प्रदीप नागापूरकर (सहसचिव, नांदेड एज्युकेशन सोसायटी), ॲड. चिरंजीलाल दागडिया, सौ. सारिका बंग (अध्यक्ष, गीता परिवार),नारायण मामडी (कोषाध्यक्ष), डॉ. उर्मिला मालू (सचिव) तसेच प्रशांत चौधरी (मुख्याध्यापक) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये जात,धर्म,पंथ,गरीब,श्रीमंत असा भेदभाव दिसून येत नाही. आपण सर्व समान आहोत याची जाणीव निर्माण होते असे सांगून गीता परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा व आत्मविश्वास मिळत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सावले व आभार बंग यांनी मानले
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पीपल्स हायस्कूल व गीता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गीता परिवाराचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpeg)
COMMENTS