श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरातील पारंपरिक 'रेणुका माता तांबुल' या प्रसादाला...
श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरातील पारंपरिक 'रेणुका माता तांबुल' या प्रसादाला केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन जी आय नोंदणीकडून प्रतिष्ठेचे 'जीआय टॅग' प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे माहूरचा तांबुल हा देशातील जीआय मानांकन मिळालेला दुसरा प्रसाद, तर महाराष्ट्रातील पहिलाच जीआय मानांकनप्राप्त प्रसाद ठरला आहे. या यशामुळे माहूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.
श्री रेणुका माता मंदिरात अनेक वर्षांपासून भाविकांना प्रसाद म्हणून तांबुल अर्पण करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा तांबुल प्रसाद भाविकांना दिला जातो. या परंपरेचा इतिहास, धार्मिक महत्त्व, औषधी गुणधर्म आणि वैशिष्ट्यपूर्ण तयार करण्याची पद्धत यांचा सखोल अभ्यास करून जीआय मानांकनासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी भौगोलिक मानांकन तज्ज्ञ प्रा. डॉ. गणेश हिंगमिरे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. रेणुका माता संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांच्यासह तांबुल तयार करणाऱ्या पारंपरिक सेवेकरी कुटुंबांचेही मोलाचे योगदान लाभले. सध्या अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही सात कुटुंबे ही परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत.
तांबुलाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा
लोकपरंपरेनुसार, श्री रेणुका मातांनी श्री विष्णुकवी महाराजांना स्वप्नात दर्शन देऊन तांबुलाचा नैवेद्य सुरू करण्याची आज्ञा दिली होती. त्यानंतर ही परंपरा आजपर्यंत अखंडपणे सुरू असून मंदिरात दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तांबुल तयार करण्याचे काम चालते.
चौदा घटकांनी तयार होतो तांबुल
या तांबुलामध्ये नागवेलीची पाने, कात, चुना, सुपारी, सोप, लवंग, वेलची, जायफळ, जायपत्री, ओवा, धनेदाळ, आस्मान तारा, ज्येष्ठमध आणि चमनबार अशा चौदा नैसर्गिक घटकांचा समावेश असतो. पारंपरिक पद्धतीने हे साहित्य एकत्र करून तयार करण्यात येते. आयुर्वेदानुसार या घटकांचे पचनासह आरोग्यासाठीही महत्त्व असल्याचे मानले जाते.
तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश
जीआय मानांकन मिळवण्यासाठी इतिहास, परंपरा, सांस्कृतिक संदर्भ, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि तांबुलाची अस्सल ओळख यांचे पुरावे सादर करावे लागले. जवळपास तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे मानांकन प्राप्त झाले आहे.
या मानांकनामुळे 'माहूरचा रेणुका माता तांबुल' या नावाचे कायदेशीर संरक्षण मिळाले असून बनावट उत्पादनांना आळा बसणार आहे. तसेच स्थानिक कारागीर, सेवेकरी आणि परिसरातील रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच धार्मिक पर्यटनालाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS