रात्रीचे नियमबाह्य भारनियमन बंद करा डीपीडीसीच्या बैठकीत खा.रवींद्र चव्हाण आक्रमक

नांदेड -  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सुरु असलेल्या नियमबाह्य भारनियमनामुळे नागरिक तसेच शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. सातत्याने सुरु असलेले ...

नांदेड -  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सुरु असलेल्या नियमबाह्य भारनियमनामुळे नागरिक तसेच शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. सातत्याने सुरु असलेले हे भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करीत खा.रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणच्या अधिकार्‍यांना आक्रमकपणे धारेवर धरले.

भारनियमनासोबतच महवितरणच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या वीज बिलांचा लाखो रुपयांचा फटकाही ग्राहकांना बसत आहे.अव्वाच्या सव्वा वीज बिले देवून ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार महावितरणकडून घडत असल्याची बाबही खा.रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.याशिवाय खा.रवींद्र चवण यांनी एस.टी.बससेवा व इतर प्रश्नांवरही आवाज उठविला होता.नांदेड विभागाकडे सध्या एकुण किती एस.टी.बसेस, चालक व वाहक कार्यरत असून रिक्त पदे कधीपर्यंत भरणार, असाही सवाल त्यांनी केला.

नायगाव येथील महसूल विभागाच्या गोडाऊनच्या जागेत बीओटी तत्वावर पीकअप पाईँट किंवा बसस्थानक उभारणे प्रवाशांच्या सोयीचे असून याबाबत कोणती कार्यवाही प्रस्तावित केली आहे, अशीही विचारणा खा.चव्हाण यांनी केली.बाभळी बंधारा बुडीत क्षेत्रातील हारेगाव, अटाळा,बेलगुजरी,  पिंपळगाव व वाघळवाडा या बाधीत गावांच्या प्रलंबित नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.ही नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणीही त्यांनी केली.

 "बंद आरोग्य केंद्रांवर  संताप 

 जिल्हा नियोजन व विकास समिती  बैठकीत खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी धर्माबाद तालुक्यासह जिल्ह्यातील बंद पडलेल्या आणि सेवेअभावी निष्क्रिय झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले.

"कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारल्या, पण डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, रस्ते नाहीत, औषधे नाहीत. मग हा निधी जनतेच्या आरोग्यासाठी होता की केवळ कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी?" असा संतप्त सवाल खासदार चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित केला.

उमरी तालुक्यातील गोळेगाव, धर्माबाद तालुक्यातील राजापूर आणि कारेगाव असे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सर्व सुविधा असूनही केवळ मनुष्यबळाच्या अभावामुळे बंद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

ग्रामीण भागातील नागरिकांना साध्या उपचारांसाठीही अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कार्यवाही करा-पालकमंत्री

रात्रीचे भारनियमन कुठल्या नियमात ेकले जाते? असा प्रश्न पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केला. भारनियमन तात्काळह बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही सावे यांनी दिल्या.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group