परभणी (). महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन व नागपूर असोसिएशन वतीने आयोजित 1 ली राज्य नामांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा नागपूर येथे दि. 26 ते 30 जून 2026 दरम्यान संपन्न झाल्या. टेबल टेनिस स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत आद्या महेश बाहेती या खेळाडूने 15 वर्षे मुलीच्या गटात उपविजेत पद पटकावले. तसेच 13 व 17 वर्षे मुली या गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तसेच कल्याणी सवंडकर 13 वर्षे मुली या गटात उपउपांत्यपूर्व फेरी खेळली.11 वर्षे मुली या गटात अदिती दुबे या खेळाडूने उपउपांत्यपूर्व फेरी खेळली.
आद्या बाहेती परभणी जिल्हास अनेक पदक प्राप्त केले आहे.
आद्या ही भारतीय खेळ प्राधिकरण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,परभणी यांच्या अंतर्गत खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिस प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
टेबल टेनिसच्या सरावासाठी तिला वेळोवेळी अनिल बंदेल, सचिन पुरी,असद अली, अजय कांबळे, ईश्वर कदम यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच ऐश्वर्या पाटील (फिजिओ) व कांचन वसेकर (योग प्रशिक्षक) यांचेही सहकार्य मिळते. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता सहावी शिकत आहे.
टेबल टेनिस राज्य संघास उज्वल यश प्राप्त झाले बद्दल
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले,क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे,सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, डॉ.माधव शेजुळ, प्रा. संतोष सावंत, जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, सह सचिव ज्ञानेश्वर पंडित परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर,

COMMENTS