नांदेड/प्रतिनिधी राज्य सरकारने शेतकर्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अनेक नियम लाऊन केवळ कर्जमाफीचा फार्स चालवला आहे. सरकारने विनाअट सरसकट कर्ज...
नांदेड/प्रतिनिधी
राज्य सरकारने शेतकर्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अनेक नियम लाऊन केवळ कर्जमाफीचा फार्स चालवला आहे. सरकारने विनाअट सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी एल्गार अन्नत्याग आंदोलन दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केले आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी केले आहे.
पंढरपूर येथे शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर आणि राज्य सरकारने याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नसल्याने आ. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानिमित्त ते मराठवाड्याच्या दौर्यावर असून दि. 25 जून रोजी सायंकाळी त्यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हेे आवाहन केले. राज्य सरकार विविध अटी टाकून शेतकर्यांचे कर्ज माफ करत नाही. सरकारच्या या धोरणामुळे 36 लाख शेतकर्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे कुठलाही पक्ष नसला तरी पक्षविरहित हे आंदोलन शेतकर्यांच्या न्याय मागणीसाठी हे आंदोलन करीत आहोत. सर्वांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. रोहित पवार, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, नरेंद्र काळे, संजय शेट्टे, जगन्नाथ काकडे, बेबीताई नाईक, विक्रांत, शहर उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगावकर, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, अल्पसंख्यांकचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिद खान, फैजल सिद्धीकी यांच्यासह मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शंकर इंगळे, नाना पोहरे, मनबीरसिंघ ग्रंथी, डॉ. दत्ता कदम, प्रकाश मुराळकर, जर्नेलसिंघ गाडीवाले, शफी उर रहेमान, मारोती चिवळीकर, युनूस खान, गंगाधर महाजन, देवकत्ते, लक्ष्मण भवरे, गंगार महाजन यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील पदाधिकार्यांशी आ. रोहित पवार यांनी साधला संवाद
नांदेड/प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे दि. 29 जून रोजी आ. रोहित पवार शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करणार असून यानिमित्त महाविकास आघाडीतील विविध राजकीय पक्षाशी आ. पवार यांनी दि. 25 जून रोजी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष विरहित हे आंदोलन असल्यामुळे आपण सर्वांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, खा. रवींद्र चव्हाण, माजी आ. रोहिदास चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार, अनिल मोरे, डॉ. दिनेश निखाते, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे, ज्योतिबा खराटे, रेखा चव्हाण, आनंद चव्हाण, सुनील कदम, राष्ट्रवादीचे धनंजय सुर्यवंशी, बालाजी पेनूरकर यांच्यासह आदी जणांची उपस्थिती होती.

COMMENTS