उदगीर / प्रतिनिधी : येथील अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक, सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ, उदगीर नगर परिषदेचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. बालाजी दिगंबरराव बिरादार यांना यावर्षीचा आरोग्य सेवेचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
बसव प्रतिष्ठान मुरूम ता. उमरगा जि. धाराशिवच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. बालाजी बिरादार यांना त्यांच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या 28 जून रोजी मुरूम येथील अयोध्या कॉम्पलेक्स, रत्नमाला मंगल कार्यालय येथे सकाळी 9 वाजता राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.
डॉ. बालाजी बिरादार यांनी वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर पुणे येथील रुबी हॉल, वाय. सी. एम. हॉस्पीटल येथे अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर आपली कर्मभूमी असलेल्या उदगीर येथे अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यांनी टीम - यु चॅरिटेबल संस्था स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले स्वतः सहभाग नोंदवला. अनेक सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले. सहभाग नोंदवला. डायबेटीस तपासणीचे अनेक शिबीरे आयोजित केली. कोरोना काळात स्वतःच्या अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलला कोरोना सेंटर बनवून रुग्णसेवा केली.त्यांचे स्वतःचे एक यु - ट्यूब चॅनेल असून त्या चॅनेलद्वारे ते मधुमेहविषयी जनजागृती करीत असतात.शहरातील स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्याना उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या कार्याची दखल घेवून अनेकांनी त्यांना सन्मानित केलं. डॉ. बालाजी बिरादार यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होतं आहे.

COMMENTS