त्यामुळे मोजे कौडगाव येथील माती उत्खनन
लोहा तालुक्यातील मौजे कौडगाव येथील गुलाब आनंदा भरकडे, संजय गोविंदा भरकडे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पाठींब्याने शासनाची कुठलीही परवानगी न घेता कौडगाव ते मारतळा जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात १००० ते १५०० हायवा माती उत्खनन करून संजय उबाळे यांच्या क्रेषर च्या बाजूला साठवणूक केली आहे. अवैध उत्खनन केल्यामुळे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात विक्रम पाटील बामणीकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील मौजे कौडगाव येथील गुलाब आनंदा भरकडे, संजय गोविंदा भरकडे यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता कौडगाव ते मारतळा जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात १००० ते १५०० हायवा माती उत्खनन करून संजय उबाळे यांच्या क्रेषर च्या बाजूला साठवणूक केली आहे.सदर अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुली तोटा होत असून परिसरातील पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांना ध्वनी व धूळ प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने उत्खनन सुरू असल्याने यांना पाठबळ देणारे तलाठी व संबंधितांवर कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे. तरी आपण सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध उत्खनन बंद करावे तसेच संबंधित व्यक्तींवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,

COMMENTS