सध्या पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाही नांदेड शहरातील कोणत्याही भागांमध्ये नालेसफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे महापालिकेच्या वतीने तात्काळ शहरातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होती पण ते आत्तापर्यंत महापालिकेला नालेसफाई करण्याची जागा नाही त्यासाठी शिवसेनेच्या वतीने मा आयुक्त साहेब यांना एका लेखी निवेदनाद्वारे शिवसेनेचे शहर प्रमुख तुळशी यादव यांनी आज लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदेड शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये नाले साफसफाई व्यवस्थित झाले नसल्यामुळे शहरात सर्वत्र गेल्या पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरुन लोकांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यानुषंगाने या वर्षी पावसाळ्यापूर्वी नांदेड शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याने तोडून भरलेले नाले लवकरात लवकर व्यवस्थित साफसफाई करण्यात यावी. जसे की, गाडीपूरा नाला, नावघाट नाला, विणकर कॉलनी, नाला, बिलालनगर नाला, करबला नाला, मरघाट नाला, शनिदेव मंदिरा जवळील नाला, गुरुद्वारा जवळील नाला, व्यंकटेशनगर भागातील नाला, नल्लागुट्टा चाल भागातील नाला, खडकपूरा भागातील नाला, गोवर्धनघाट नाला व शहरातील विविध ठिकाणी नाले साफसफाई तात्काळ करण्यात यावी. जेणे करुन येणाऱ्या पावसाळ्याच्या पाण्यामुळे लोकांचे होणारे आर्थिक व जिवीत हानीचे नुकसान होणार नाही.
याची महापालिकेने तात्काळ दक्षता घ्यावी
तसेच काही दिवसापूर्वी देगलूरनाका भागात चार मुल मरण पावली होती असे खड्डे शहरात ज्या ज्या ठिकाणी असतील ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे. जेणे करुन पावसाळ्याचे पाणी जमा होऊन कोणाचीही जिवीत हाणी होणार नाही. याची माननीय आयुक्त साहेब यांनी दखल घ्यावी आणि तात्काळ शहरातील खड्डे व नालेसफाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नांदेड दक्षिण शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे

COMMENTS