अर्धापूर (जिल्हा नांदेड) : दि.७ मे गुरूवार रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान दोन दुचाकींचा अपघात झाला यात दोघांचा मृत्यु तर दोघेजण गंभीर जखमी...
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : दि.७ मे गुरूवार रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान दोन दुचाकींचा अपघात झाला यात दोघांचा मृत्यु तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना तामसा ते अर्धापूर रोडवरील लोणी गावाच्या पाटीजवळ घडली आहे.अजिंक्य देविदास चाटसे वय २५ वर्षे रा.लोणी ता.अर्धापूर हा आपल्या मित्राच्या लग्नावरून घराकडे परतत असतांना तो तामसा ते अर्धापूर मार्गे जात होता. तर अभिषेक विश्वांभर नागठाणे (वय २५) वर्ष रा.तामसा ता.हादगाव हा अर्धापूर
तामसा मार्गे जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली यामधील जखमिंना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अजिंक्य देविदास चाटसे वय २५ वर्षे रा.लोण ता.अर्धापूर व अभिषेक विश्वांभर नागठाणे (वय २५) वर्ष रा.तामसा ता.हादगाव यांना मृत घोषीत केले. तर त्यांच्या सोबत असलेले अन्य दोघे गंभिर जखमी आहेत. सदर घटनास्थळी नरेंद्राचार्य संस्थान रूग्णवाहीका चालक राजु पाचंगे, १०८ रूग्णवाहीकाचे डॉ.आनंद शिंदे,चालक मारोती गिरी स्थानिक नागरिक आदिंनी मदत केली. सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने व अनेक ठिकाणी रस्ता ओबडधोबड खालीवर असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असुन यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.

.jpeg)
COMMENTS