नांदेड: जिल्ह्यात बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून, गेल्या एका महिन्यात (१२ एप्रिल ते १३ मे) तब्बल ३६ बालविव...
नांदेड: जिल्ह्यात बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून, गेल्या एका महिन्यात (१२ एप्रिल ते १३ मे) तब्बल ३६ बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी कारवाई करण्यात आली. प्राप्त झालेल्या बहुतांश तक्रारी '१०९८' या राष्ट्रीय बालसुरक्षा हेल्पलाईनद्वारे मिळाल्या होत्या. अलीकडील कारवाई: गेल्या अवघ्या दोन दिवसांत लोहा, नायगाव, कंधार, बिलोली आणि उमरी तालुक्यांतील ६ बालविवाह थांबवण्यात आले.: जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, चाईल्ड लाईनचे पथक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समन्वयामुळे ही कामगिरी फत्ते झाली.पुढील पाऊल: रोखण्यात आलेल्या मुलींना पुढील संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे: बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठेही बालविवाह होत असल्यास नागरिकांनी १०९८ वर संपर्क साधावा.

COMMENTS