किनवट, दि. ११ मे : जून महिन्यापासून शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व दाखल्यां...
किनवट, दि. ११ मे : जून महिन्यापासून शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक दाखले वेळेपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने काढून घ्यावेत, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रवेश प्रक्रियेच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकाच वेळी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करतात. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीवर अतिरिक्त ताण येऊन तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.
ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळा किंवा महाविद्यालय प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र दाखले आतापासूनच ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करून प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले आहे.

COMMENTS