किनवट, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील चिखली गोखुळ नगर येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
किनवट, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील चिखली गोखुळ नगर येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला या दोघींचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने हा दावा फेटाळत दोन्ही बालिकांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सई दिलीप मुंगल (वय ४) हिचा ८ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिची मोठी बहीण श्रुष्टी दिलीप मुंगल (वय ६) हिचा ९ मे रोजी रात्री आदिलाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंगल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिखली गोखुळ नगर परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, या घटनेबाबत गोकुंदा उपजिल्हा
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांनी स्पष्ट केले की, संबंधित दोन बालिकांना सर्पदंश झालेला नव्हता. दूषित अन्न सेवन केल्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.याच दिवशी अंदबोरी येथील एका शेतकऱ्याला नागाने दंश केल्याची घटना घडली होती. दंशानंतर संबंधित व्यक्तीवर गावातच खाजगी उपचार करण्यात आले. सुमारे एक तासानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहितीही डॉ. केंद्रे यांनी दिली.सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारचे खाजगी उपचार न करता तातडीने शासकीय रुग्णालयात रुग्णाला दाखल करावे. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध असल्याचेही डॉ. केंद्रे यांनी सांगितले.

.jpeg)
.jpeg)
COMMENTS