माहूर(प्रतिनीधी)माहूर शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह, गौसीया मस्जिद, सोनापिर दरगाह, नगीना मस्जिद ...
माहूर(प्रतिनीधी)माहूर शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह, गौसीया मस्जिद, सोनापिर दरगाह, नगीना मस्जिद तसेच तानुशाह भानुशाह मस्जिद येथे ईदनिमित्त सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली. नमाजानंतर ईदगाह परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
नमाजपूर्वी इमाम सहाब यांनी आपल्या प्रवचनातून इस्लाम धर्म हा अमन आणि शांतीचा संदेश देणारा असल्याचे सांगितले. जगात सदैव शांतता, सौहार्द आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. कोणाविषयीही मनात कटुता न ठेवता सर्वांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला.
प्रेम दिल्याने ते वाढते, या भावनेतून या ईद सणाच्या माध्यमातून विविध धर्मीयांमध्ये प्रेम, सौहार्द आणि ऐक्य वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आजच्या काळात हीच एकतेची भावना समाजासाठी अत्यंत गरजेची असून, त्यातूनच विश्वबंधुत्वाची संकल्पना साकार होऊ शकते, असेही इमाम साहेबांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,आनंद तुपदाळे , विजय भाऊ कांबळे यांचे सह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS