नांदेड, ०६ मे : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि.०६.०५.२०२६ रोजी पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान द्वारे राष्ट्रीय क्षयर...
नांदेड, ०६ मे : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि.०६.०५.२०२६ रोजी पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान द्वारे राष्ट्रीय क्षयरोग दुर्रीकरण कार्यक्रम अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे आयुष्यमान "100 डे टीबी कॅम्पियन" 2nd फेज कार्यक्रमातून आयुष्यमान आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराचे आयोजन पालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, अतिरीक्त आयुक्त, गिरीश कदम, अतिरीक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अजितपालसिंग संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत रिठे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ मोहम्मद बदीयोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमासाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, शहर क्षयरोग अधिकारी डॉ मोहम्मद बदीओदिन, खडकपुरा दवाखाना येथील आरोग्य अधिकारी डॉ रितेश बिशेन, फार्मासिस्ट रंजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल डोके, क्षयरोग सुपर वायझर राम सोळंके, कार्यक्रम समनव्यक बालाजी साखरे, पांडुरंग दुमाणे, रविंद्र कुमार कावडे, विश्वास साबणे, Xray टेक्निशियन किशोर राठोड, साथी संस्थेचे राजू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला.सदरील शिबिराचे आयोजन हे तीन दिवसीय दिनांक ०६.०५.२०२६ ते ०८.०५.२०२६ या कालावधीत केले आहे. जेणे करून शिबीरामध्ये सर्व कैद्यांना xray मशीन द्वारे तपासणी करता येईल, आज झालेल्या या शिबिरात जिल्हा कारागृहातील ९० कैद्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचे कारागृहातच xray काढण्यात आले आहेत. सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी क्षयरोग विभागाचे कर्मचारी, कारागृहातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक आदींनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS