उमरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवत कथाकार परमपूज्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या भागवत कथेला उमरीत...
उमरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवत कथाकार परमपूज्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या भागवत कथेला उमरीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.17 मे रविवारपासून सुरू झालेल्या कथेच्या माध्यमातून परमपूज्य गजेंद्र महाराजांनी आजच्या तरुण पिढीला उपदेश केला आहे.आई वडिलांची सेवा करण्याचे त्यांनी आवाहन करत लहान वयातच बालकांवर चांगले संस्कार घडवावेत.तर मोठी झाल्यावर ती मुले आपल्या आई वडीलांची सेवा करतील. कलीयुगात सध्या भयावह वातावरण निर्माण झाले आहे.महिलांवरील अत्याचार वाढले, तरूण पिढी बिघडत चालली आहे. संपतीमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत अशा घटना न्यायालय न्यायप्रविष्ट आहेत परंतु कुणीच कुणाचे ऐकत नाही ही शोकांतिका आहे.घरात धार्मिक वातावरण असावे, साधू संताची संगती असावी, चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे याची अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितले आहे श्रीमद भागवत ग्रंथ नसून तो प्रत्यक्ष भगवंत आहे.तो कल्पतरू आहे. भागवत कथा श्रवणाने मानवाचा उध्दार झाल्याशिवाय राहत नाही असेही त्यांनी सांगितले आहे. अधिक महिन्यात देवाचे अधिकाधिक नामस्मरण करा अधिक पुण्य प्राप्त होईल. हा अधिक महिना हा दुग्ध शर्करा योग आहे.
....

COMMENTS