POSH Act ची अंमलबजावणी बंधनकारक : खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची SHE BOX पोर्टलवर नोंदणी करावी

नांदेड, दि. १० एप्रिल :- कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व लैंगिक छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी POSH Act 2013 (प्रतिबंध, मनाई व ...

नांदेड, दि. १० एप्रिल :- कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व लैंगिक छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी POSH Act 2013 (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
या कायद्यानुसार, कोणत्याही कार्यालयात 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee - ICC) स्थापन करणे बंधनकारक आहे. ही समिती कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
याशिवाय, केंद्र शासनाने या समित्यांची पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी SHE BOX Portal (Sexual Harassment Electronic Box) हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
SHE BOX पोर्टलद्वारे महिलांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदविता येतात तसेच संबंधित आस्थापनांमधील समित्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध राहते. त्यामुळे तक्रारींचे वेळेवर निवारण होण्यास मदत होते.
नोंदणीसाठी संबंधित आस्थापनांनी https://shebox.wed.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “Internal Complaints Committee Registration” या पर्यायाद्वारे “Private Head Office Registration” पूर्ण करणे आवश्यक आहे. आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी सर्व खासगी आस्थापनांना आवाहन केले आहे की, त्यांनी कायद्याचे पालन करून तात्काळ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी व तिची नोंदणी SHE BOX पोर्टलवर करावी.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सन्मानपूर्वक कामकाजाच्या वातावरणासाठी POSH Act ची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असून, सर्व संस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group