परभणी (क्रीडा प्रतिनिधी).: दिल्ली येथील त्यागराज इंडोअर स्टेडियम येथे दि.16 ते 22 एप्रिल दरम्यान भारतीय खेळ महासंघ आयोजित 14 वर्षाखालील मुले मुले राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धे चे आयोजन करण्यात आलेले आहे. 69 व्या अंतर शालेय राष्ट्रीय स्पार्जेसाठी 14 वर्षातील मुली या
वयोगटामध्ये परभणी जिल्हाकडून संभाजी नगर विभागाचे नेतृत्व कर न्यासाठी महाराष्ट्र संघात कु. शरयू सुरेखा माधव टेकाळे हिची निवड झाली आहे. शरयू ही परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेची खेळाडू असून ती स्कॉटिश अकॅडमी शाळेत इयत्ता आठवी मध्ये शिकते.शरयू ही भारतीय खेळ प्राधिकरण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,परभणी यांच्या अंतर्गत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिस प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
टेबल टेनिसच्या सरावासाठी तिला वेळोवेळी अनिल बंदेल, सचिन पुरी,असद अली,अजय कांबळे, ईश्वर कदम यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच ऐश्वर्या पाटील (फिजिओ) व कांचन बसेकर (योग प्रशिक्षक) यांचेही सहकार्य मिळते. टेबल टेनिस संघात निवड झाल्याबद्दलमहाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले,क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे,सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, सह प्रशिक्षक विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते,भक्ती मुक्तावार तसेच पालकांनी अभिनंदन केले.

COMMENTS