सेलू : येथील नूतन विद्यालयात पदोन्नतीने उपक्रमशील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांची गुरुवार ( दि. १० ) रोजी पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर ३० वर्षे प्रदिर्घ सेवेत अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन करत, सेलू तालुक्यात अनेक राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विविध क्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत.खेलो इंडिया बीच गेम्स दिव दमण,व नॅशनल गेम्स डेहराडून येथे सहभागी झाले आहेत.
या नियुक्ती बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरूजी, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, सेवा निवृत्त पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी अभिनंदन केले आहे.
१. सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश माळवे यांचा सत्कार करताना सेवा निवृत्त पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर, या प्रसंगी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड.

COMMENTS