माहूर: श्री दत्तशिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज ४ एप्रिल रोजी ब्रह्मलीन झाले. त्यांच्या स्मरणार्थ १९ एप्रिल २०२६ रोजी माहू...
माहूर: श्री दत्तशिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज ४ एप्रिल रोजी ब्रह्मलीन झाले. त्यांच्या स्मरणार्थ १९ एप्रिल २०२६ रोजी माहूरगड येथे भव्य 'षोडशी' कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे स्वरूप व प्रमुख उपस्थिती:मार्गदर्शन: प.पू. डॉ. धनेश्वर ऊर्फ शाम भारती महाराज.
प्रमुख पाहुणे: जुना आखाड्याचे आचार्य स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज यांसह देशभरातील संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
वेळापत्रक: सकाळी ६ वा. तीर्थस्थापना, १० ते १२ सत्संग, दुपारी १२ पासून षोडशी व महाप्रसाद, आणि रात्री ८ वा. सव्वाखंडी महापूजा संपन्न होईल.
भाविकांसाठी सुविधा:
कार्यक्रमास लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने संस्थानतर्फे अन्नदान, पाणी आणि आरोग्य सेवा सज्ज करण्यात आल्या आहेत. गडावर खाजगी वाहनांना बंदी असून भाविकांच्या सुविधेसाठी माहूर आगारातर्फे विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे सचिव बाळू महाराज काकानी आणि व्यवस्थापक गणेश ठेंगे यांनी केले आहे.

COMMENTS