मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी माजी समाज कल्याण सभापती तथा युवा नेते स्वप्नील च...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी माजी समाज कल्याण सभापती तथा युवा नेते स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी माजी समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण यांची मुखेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र दिले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, माजी आ. अविनाश घाटे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या उपस्थितित नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या निवडीचे तालुक्यात फटाके वाजवत पेढे वाटून स्वागत करण्यात येत आहे. स्वप्निल चव्हाण यांनी गतवर्षी दि. ११ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची चव्हाणवाडी ता. मुखेड येथे मोठी जाहीर सभा घेतली होती. उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांच्या भाषणाची ऊर्जा कायम ठेवत स्वप्नील चव्हाण यांनी तालुक्यात पक्ष संघटन केले. त्यांनी करत असलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. यावेळी स्वप्नील चव्हाण म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन पक्षाला सत्तेत बसवून सर्व सामान्य जनतेला न्याय देत सर्वांगीन विकास करून स्व. अजित दादांना अभिप्रेत असलेले कार्य पक्षश्रेठीच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांचे आभार मानले. या निवडीचे तालुक्यातून स्वागत होत आहे.

COMMENTS