नांदेड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी...
नांदेड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्षाचा प्रारंभ) नांदेड शहरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अभिवादन व प्रभात फेरी: सकाळी ७:३० वाजता स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पथनाट्य व कविता सादर करत सामाजिक जागृती केली.पुतळा पूजन: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रबोधन व ग्रंथ वाटप: जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत 'समग्र वाङ्मय' ग्रंथ भेट दिले. समाज कल्याण कार्यालयातील व्याख्यानात डॉ. भीमराव हाटकर यांनी फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.
स्वच्छता अभियान व संविधान वाचन: सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून अशोक नगर येथील नवबौद्ध वस्तीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले, तसेच कार्यक्रमात सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक सचिन खुणे, गजानन नरवाडे, राज गोडबोले, संभाजी कांबळे व समतादूतांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS