नांदेड/प्रतिनिधी-नांदेडच नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षण क्षेत्रात ठसा उमटविलेल्या पीपल्स हायस्कूलच्या नवीन इमारतीसाठी प्...
नांदेड/प्रतिनिधी-नांदेडच नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षण क्षेत्रात ठसा उमटविलेल्या पीपल्स हायस्कूलच्या नवीन इमारतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ही शाळा सुसज्य अशा इमारतीत सुरु होईल, असा विश्वास नांदेड एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील यांनी व्यक्त केला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सीए डॉ. प्रवीण पाटील उपाध्यक्षपदी ऍड. प्रफुल्ल अग्रवाल, सचिपदी प्रा. शामलताई पत्की व सहसचिपदी एड.प्रदीप नागापूरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल पीपल्स हायस्कूल शालेय समिती व पीपल्स हायस्कूल च्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष स.नौनीहालसिंघ जागीरदार यांनी शाळेच्या विकासासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी करीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी सत्कारला उत्तर देताना सीए डॉ.प्रवीण पाटील यांनी म्हणाले संस्थेचे अध्यक्ष होणे हा माझे ध्येय नसून संस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीने आमची सर्व टीम डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आलो आहोत. यापुढेही संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ आणि माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी घालून दिलेल्या पायवाटेवरच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. पीपल्स हायस्कूलच्या नव्या इमारत बांधकामाच्या परवानगीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ही शाळा एका सुसज्य इमारतीत स्थलांतरीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी केले सूत्रसंचालन श्रद्धा सावले व आभार राहुल गोरे यांनी मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड.प्रफुल्ल अग्रवाल व सहसचिव ऍड. प्रदीप नागपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यकारणी सदस्य अलीभाई पंजवानी, ऍड.चिरंजीलाल दागडिया, नगरसेविका शांभवी साले, उपप्राचार्य शुक्ला मॅडम, डॉ. किरण चिद्रावार, माजी मुख्याध्यापक नितीन सेलमकर, कुंभार, गिरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

.jpeg)

COMMENTS