नांदेड - मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरले कुष्ठधाम नंदनवन तथा पद्मश्री शामरावजी कदम प्रौढ मतिमंद मुलांची निवासी ग्रामीण कृषी कार्यशाळा नेर...
नांदेड - मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरले कुष्ठधाम नंदनवन तथा पद्मश्री शामरावजी कदम प्रौढ मतिमंद मुलांची निवासी ग्रामीण कृषी कार्यशाळा नेरलेच्या विश्वस्तांच्या वतीने संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त व नांदेड एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ विश्वस्त तथा नूतन अध्यक्ष म्हणून माननीय प्रवीण सदाशिवरावजी पाटील यांची एक मताने निवड झाल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार मराठवाडा लोकसेवा मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त, उद्योगपती तथा नांदेडचे प्रसिद्ध दानी व्यक्तिमत्व आदरणीय बनारसीदाजी अग्रवाल यांच्या हस्ते संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.हंसराज वैद्य यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन करण्यात आला व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याप्रसंगी संस्थेचे सर्व श्री सन्माननीय विश्वस्त एम.आर.जाधव, विजय मालपाणी, डॉ.लक्ष्मीकांत बजाज, राजेश लोटिया, टी.एम. गायकवाड, तथा डॉ.शितलताई भालके हे मान्यवर उपस्थित होते.
त्याप्रसंगी संस्थेचे सर्व श्री सन्माननीय विश्वस्त एम.आर.जाधव, विजय मालपाणी, डॉ.लक्ष्मीकांत बजाज, राजेश लोटिया, टी.एम. गायकवाड, तथा डॉ.शितलताई भालके हे मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS