माहूर (प्रतिनिधी) माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या ८२९ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आश्...
माहूर (प्रतिनिधी) माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या ८२९ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. दि. १७ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते.
पालकमंत्री अतुल सावे यांनी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेतली.बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सावे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूरगडच्या विकासासाठी ८२९ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीअंतर्गत प्रस्तावित विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, वनविभाग व पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून विकासाला गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी श्री रेणुकामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निधी अभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांसंदर्भात नुकतीच ना. गुलाबराव पाटील यांनी बैठक घेतली असून लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले.आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री सावे यांनी श्री दत्तशिखर संस्थान येथे जाऊन भगवान दत्तात्रेयांचे दर्शन तसेच प. पू. डॉ. धनेश्वरजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी रेणुकामाता मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विकास कपाटे व व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व रेणुकामातेचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा गिऱ्हे,शहराध्यक्ष स्वाती आडे, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, फिरोज पठाण, विलास पाटील, मनीष राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpg)
COMMENTS