शेतकरी संघटनेच्या दणक्याला यश, मका व ज्वारी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू - रमेश कदम

  किनवट ता. प्र. 11 एप्रिल आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील मका खरेदी संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी प्रफुल्ल सोयाम यांच्य...

 


किनवट ता. प्र. 11 एप्रिल आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील मका खरेदी संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी प्रफुल्ल सोयाम यांच्याशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी चर्चा केली असता सोमवार दि. 13 एप्रिल 2026 पासून मका व ज्वारी खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याआधी वर्तमानपत्रातून जाहिरात व प्रसिद्धी देणे, गावोगावी शेतकऱ्यांना माहिती देणे, कायद्याने बंधनकारक आहे.वारंवार पाठपुरावा, तक्रारी, रास्ता रोको आंदोलने केल्यामुळे पुढील दोन दिवसांत नोंदणी सुरू होत असताना अजूनही महामंडळाने तशी जाहिरात, प्रसिद्धी, गावोगावी माहिती दिलेली नाही. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली नाही. याचा परिणाम म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली मका खुल्या बाजारात पंधराशे रुपये क्विंटल विकली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला महामंडळाचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संयोगातून चालत असलेला शेतकरी लुटीचा अजेंडा जुनाच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आज पर्यंत शेतकरी लुटला गेला असला तरी आता मात्र संघटना शेतकऱ्यांची लूट कदापि सहन नाही.कदाचित सोमवारी ते जाहिरात देतील मग शेतकऱ्यांना कळायला दोन-तीन दिवस जाणार आणि तोपर्यंत मात्र व्यापारी आणि दलाल नोंदणी करून मोकळे होतात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. महामंडळाच्या या कार्यपद्धतीवर शेतकरी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मका पिकाचि पट्टा असलेल्या सर्व किनवट तालुक्यात ग्रामसेवक व तलाठ्याच्या माध्यमातून तसेच हनुमान मंदिरातील भोंग्याच्या माध्यमातून, शक्य असेल त्या सर्व माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना नोंदणी व आवश्यक कागदपत्रा बद्दलची माहिती देण्यात यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदवावा यासाठी महामंडळाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी सूचना यावेळी शेतकरी संघटनेने केली. प्रत्यक्षात सोमवारी नोंदणी सुरू करण्याचे आश्वासन मिळाले असले तरी सोमवारी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नोंदणी करून घेता येणे शक्य व्हावे म्हणून ही आगाऊ सूचना शेतकरी संघटने मार्फत दिली जात आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना सोमवारी सकाळी 11.00 वा. आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात उपस्थित रहावे, ही नम्र विनंती. शेतकरी बांधवांनी सोमवारी उपस्थित राहून आपापली नोंदणी करून घ्यावी. कोणाच्याही दबावाखाली येऊ नये व आपला सातबारा कोणालाही देऊ नये. शेवटच्या शेतकऱ्याची मका व ज्वारी खरेदी होईपर्यंत संघटना आपल्या सोबत असणार आहे. प्रसंग आला तर रस्त्यावर उतरण्यास कटिबद्ध आहे. आम्ही सारे शेतकरी आता आमची एकच जात आहे. काही अडचण आल्यास शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा. 

आपलाच 

रमेश कदम पाटील

शेतकरी संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष युआ. 9764281404

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group