चिखलवाडी येथील मुख्य रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. जुना रस्ता फोडून नवीन रस्ता तयार ...
चिखलवाडी येथील मुख्य रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. जुना रस्ता फोडून नवीन रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, रस्त्याचे काम करताना सुमारे एक ते दीड फूट खोदकाम करून गिट्टी व माती टाकून दबाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरचा सिमेंट काँक्रिटचा मुख्य टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्यांचे कामही प्रलंबित आहे.
सध्या रस्ता खोदलेल्या अवस्थेतच ठेवण्यात आल्यामुळे परिसरातील दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुकानांपर्यंत ग्राहक पोहोचणे कठीण झाले असून व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना रोज इजा सहन करावी लागत असून अनेक जण घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. छोट्या रस्त्यावर वाहनांची एकमेकांना घासाघीस होत असल्याने वादविवादही वाढले आहेत.
या सर्व परिस्थितीमुळे चिखलवाडीतील नागरिक व दुकानदार संतप्त झाले असून रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS