समुद्रात जहाजावर काम करणारे सुमारे 20 हजार भारतीय नाविक सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अडकले आहेत, अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा मर्यादित पुरवठा होत असल्याच्या वृत्ताने खूप चिंता वाटत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी संकटात सापडलेल्या नावीकांना सहकार्य करावे असे आवाहन नॅशनल युनियन सीफेरअर्स ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी श्री . मिलिंद कांदळगावकर यांनी भारत सरकारला केले आहे. बरेच खलाशी आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ ( ITF ), मेरीटाईम युनियन ऑफ इंडिया ( MUI ) किंवा नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया ( NUSI )यांच्या औपचारिक करारांतर्गत येत नसले, तरी भारतीय नागरिक आणि सहकारी खलाशी म्हणून त्यांची ओळख आपल्या सर्वांवर सामायिक जबाबदारी आहे. समुद्रात, जेव्हा मानवी जीव धोक्यात असतात तेव्हा सहमती किंवा संलग्नतेचा कोणताही भेद नाही. आम्ही भारत सरकार आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ही मानवतावादी आणीबाणी म्हणून पाहण्याची आणि यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती करतो.
महत्त्वाचे म्हणजे अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीचा पुरवठा सुनिश्चित करा त्याचप्रमाणे संप्रेषण आणि मागोवा यंत्रणा स्थापित करणे जिथे आवश्यक असेल तेथे सुरक्षित मार्ग किंवा स्थलांतर सुलभ करणे. संकटात सापडलेल्या प्रत्येक भारतीय नाविकाच्या पाठीशी सर्व नाविक संघटना एकजुटीने उभ्या आहेत. या कठीण काळात मानवी जीवन, प्रतिष्ठा आणि सुरक्षा यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

COMMENTS