नांदेड:( दि.२८ एप्रिल २०१६)
यशवंत महाविद्यालयात भारत एनवोर्मेन्ट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत विविध उपक्रम माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ.एल. व्ही. पद्माराणी राव यांच्या समन्वयाद्वारे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. रिसर्च हाइट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या अभियानात १५८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपक्रमाचा प्रारंभ प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे व समन्वयिका डॉ.एल व्ही पदमारानी राव यांच्या प्रमुख उपस्थितीत अमूल्य मार्गदर्शनाने झाला. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी, हरित कॅम्पस हे केवळ शिक्षणाचे स्थान नसून ज्ञान आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे जिवंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन केले.
तदनंतर डॉ.कैलास इंगोले यांच्या समन्वयाखाली यशवंत महाविद्यालय ते भाग्यनगर मार्गावर समुदाय जनजागरण रॅली काढण्यात आली. भाग्यनगर परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थितांना दिला.
डॉ.राजरत्न सोनटक्के यांच्या प्रयत्नातून झिरो प्लॅस्टिक ड्राईव्ह अंतर्गत बाबानगर येथील शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ.रमेश चिल्लावार यांच्या समन्वयाखाली कॅम्पस ग्रीन ॲक्शन अंतर्गत महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्या ठिकाणी डॉ.संतोष राऊत यांनी, कचरा व्यवस्थापन व जलपुनर्वापर यावर मार्गदर्शन केले.
डॉ.बी. बालाजीराव यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरणाकरिता सहकार्य केले. डॉ.एम.एम. व्ही.बेग यांनी महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट केले. डॉ. मदन अंबोरे यांनी सस्तेनेबलिटी आयडियाज अँड सोल्युशन या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याकरिता सहकार्य केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रियंका सिसोदिया, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ. कांचन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.योगेश नकाते, डॉ.सचिन पाटील, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.अजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
या मिशनच्या यशस्वीतेमागे महाविद्यालय प्रशासनाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरला. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून पर्यावरणपूरक व सामाजिकदृष्ट्या जबाबदार कॅम्पस घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला अधिक बळकटी मिळाली.

COMMENTS