किनवट (प्रतिनिधी) : किनवट पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीसांना वेळोवेळी मदतीसाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत आज ...
किनवट (प्रतिनिधी) : किनवट पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीसांना वेळोवेळी मदतीसाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत आज पोलीस मित्रांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमामुळे सण-उत्सव, वाहतूक नियमन व आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या पोलीस मित्रांची ओळख सुलभ होणार असून, शिस्त व एकसंधता वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक कराड यांनी पोलीस मित्रांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, त्यांच्या सहकार्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावी होते, असे नमूद केले.
कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS