उदगीर: लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी उदगीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ५...
उदगीर: लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी उदगीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ४५ हजार रुपये स्वीकारताना उदगीर शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्यावरही लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ३१ मार्च २०२६ रोजी भादंवि (BNSS) कलम ७६, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आरोपी क्रमांक १ पोलीस हवालदार राहुल बाबूराव नागरगोजे (उदगीर शहर पोलीस ठाणे) आणि आरोपी क्रमांक २ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी (उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अहमदपूर रोडवरील हॉटेलमध्ये पडला सापळा
तक्रारदाराने १ एप्रिल रोजी लातूर एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. २ एप्रिल रोजी एसीबीने पडताळणी केली असता, पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या सांगण्यावरून हवालदार नागरगोजे यांनी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
गुरुवारी दुपारी अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे सापळा रचण्यात आला. यावेळी हवालदार राहुल नागरगोजे याने तक्रारदाराकडून ४५ हजार रुपये स्वीकारले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे याने पोलीस निरीक्षक पुजारी यांना फोन करून तक्रारदार "भेटल्याची" (पैसे मिळाल्याची सांकेतिक भाषा) माहिती दिली. त्यानंतर तक्रारदारानेही पीआय पुजारी यांच्याशी फोनवर चर्चा केली असता, पुजारी यांनी "पाठवून द्या ना मला, मदत करता येईल" असे म्हणून लाच स्वीकारल्याची पुष्टी केली.
एसीबीची धडाकेबाज कारवाई
पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राहुल नागरगोजे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेचे ४५ हजार रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.
ही कारवाई लातूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ब्युरो रिपोर्ट: ग्लोबल मराठवाडा
नेमकी घटना काय?
तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ३१ मार्च २०२६ रोजी भादंवि (BNSS) कलम ७६, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आरोपी क्रमांक १ पोलीस हवालदार राहुल बाबूराव नागरगोजे (उदगीर शहर पोलीस ठाणे) आणि आरोपी क्रमांक २ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी (उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अहमदपूर रोडवरील हॉटेलमध्ये पडला सापळा
तक्रारदाराने १ एप्रिल रोजी लातूर एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. २ एप्रिल रोजी एसीबीने पडताळणी केली असता, पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या सांगण्यावरून हवालदार नागरगोजे यांनी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
गुरुवारी दुपारी अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे सापळा रचण्यात आला. यावेळी हवालदार राहुल नागरगोजे याने तक्रारदाराकडून ४५ हजार रुपये स्वीकारले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे याने पोलीस निरीक्षक पुजारी यांना फोन करून तक्रारदार "भेटल्याची" (पैसे मिळाल्याची सांकेतिक भाषा) माहिती दिली. त्यानंतर तक्रारदारानेही पीआय पुजारी यांच्याशी फोनवर चर्चा केली असता, पुजारी यांनी "पाठवून द्या ना मला, मदत करता येईल" असे म्हणून लाच स्वीकारल्याची पुष्टी केली.
एसीबीची धडाकेबाज कारवाई
पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राहुल नागरगोजे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेचे ४५ हजार रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.
आरोपी १: राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, ब.नं. १३३७)
आरोपी २: राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण)
लाचेची रक्कम: ४५,००० रुपये (स्विकारले), ५०,००० (मागणी)
ठिकाण: हॉटेल पंचवटी, उदगीर
घराची झडती आणि गुन्ह्याची नोंद
सध्या दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई लातूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ब्युरो रिपोर्ट: ग्लोबल मराठवाडा

COMMENTS