नांदेडमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्टल आणि खंजरासह दोघांना ठोकल्या बेड्या!

नांदेड: शहरात अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून अटक केली ...

नांदेड: शहरात अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि एक लोखंडी खंजर असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून रचला सापळा नांदेड जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष मोहीम उघडली आहे. या अंतर्गत २५ मार्च २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, विमानतळ ते शिवमंदीर रोडवरील आसरा नगर फाट्याजवळ दोन तरुण शस्त्र विक्रीसाठी थांबल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

अटकेतील आरोपींची नावे
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील दोघांना ताब्यात घेतले:
सय्यद शाहेद ऊर्फ पटेल (वय २२ वर्ष, रा. रहिमपुर, वसरणी).
दीपक ऊर्फ छक्या विनोद भोकरे (वय २६ वर्ष, रा. कौठा, नांदेड).
यांची अंगझडती घेतली असता सय्यद शाहेद याच्याकडे मॅग्झीनसह गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली, तर दीपक भोकरे याच्याकडे लोखंडी खंजर मिळून आला.
तपासात धक्कादायक खुलासा
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी ही शस्त्रे निखिल ऊर्फ चिंट्या रमेश घोरपडे (रा. वसरणी) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निखिल घोरपडे याचा शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, अंमलदार माधव माने, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड आणि चमूने फत्ते केली. 
ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठवाडा

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group