धर्माबाद: धर्माबाद रेल्वे स्टेशनचा समावेश नांदेड रेल्वे डिव्हिजनमध्ये करण्याऐवजी प्रशासनाने खोडसाळपणे केवळ 'समराळा' स्टेशनपर्यंतच सी...
धर्माबाद: धर्माबाद रेल्वे स्टेशनचा समावेश नांदेड रेल्वे डिव्हिजनमध्ये करण्याऐवजी प्रशासनाने खोडसाळपणे केवळ 'समराळा' स्टेशनपर्यंतच सीमा मर्यादित ठेवल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. एस. जाधव यांनी थेट माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी १९९९ मध्ये दिलेल्या पत्राचा पुरावा सादर करत रेल्वे प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे.काय आहे जुना संदर्भ?
तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी डॉ. जाधव यांना पाठवलेल्या पत्रात धर्माबाद फाटा नांदेड रेल्वे डिव्हिजनला जोडण्याची मागणी तत्वतः मान्य केली होती. मात्र, २८ वर्षे उलटूनही रेल्वे प्रशासनाने यावर ठोस अंमलबजावणी न करता उलट धर्माबाद स्टेशनला वगळून नवीन नोटिफिकेशन जारी केले आहे.
हैदराबाद डिव्हिजनची 'मक्तेदारी' आणि भाषेची अडचण
सध्या नांदेड रेल्वे डिव्हिजनची सीमा शिवणगाव स्टेशनपर्यंत आहे. यामुळे धर्माबाद ते शिवणगाव हा ३०-३५ कि.मी.चा पट्टा हैदराबाद डिव्हिजनमध्ये येतो. या भागावर तेलगू भाषिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी असल्याने मराठी भाषिक प्रवाशांना प्रशासकीय कामांत अडचणी येत आहेत. तसेच, रेल्वेच्या विकासकामांमध्येही या भागावर अन्याय होत असल्याची भावना डॉ. जाधव यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींचा विरोध आणि ट्विटचा आधार
धर्माबादमधील सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि पत्रकारांनी या नोटिफिकेशनला तीव्र विरोध दर्शविला आहे. धर्माबाद रेल्वे स्टेशनचा समावेश करून ही सीमा थेट तेलंगणा बॉर्डरपर्यंत वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. डॉ. जाधव यांनी सध्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार डॉ. अजित गोपछेडे यांना ट्विटद्वारे जुन्या पत्राची आठवण करून देत अंमलबजावणीची मागणी केली आहे.
महत्त्वाची मागणी: "धर्माबाद रेल्वे स्टेशनचा समावेश नांदेड डिव्हिजनमध्ये केल्यास दक्षिण मध्य रेल्वेचा मनमाड ते धर्माबाद असा नैसर्गिक विस्तार होईल आणि मराठी भाषिकांना रेल्वे प्रशासनात न्याय मिळेल."
ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठवाडा

COMMENTS