नांदेड: शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या आणि टवाळक्या करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध नांदेड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. ज...
नांदेड: शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या आणि टवाळक्या करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध नांदेड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या शहर व इतवारा दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवून गेल्या तीन महिन्यांत शेकडो टवाळखोरांवर कारवाई केली असून हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार: एकूण २५१ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
मोटार वाहन कायद्यानुसार: १९ केसेसची नोंद करण्यात आली आहे.
दंड वसुली: या सर्व कारवायांमधून आतापर्यंत एकूण ३५,५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जनजागृती आणि सुरक्षा तपासणी
केवळ कारवाईच नाही, तर दामिनी पथकाने शहरातील ५० पेक्षा अधिक शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस आणि लॉजेसची तपासणी केली आहे. पथकातील महिला पोलिसांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. छेडछाड किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांचे कडक निर्देश
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. "नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल कटिबद्ध असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविण्यात येतील," असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
आवाहन: कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा छेडछाडीच्या घटनांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास देऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठवाडा
टवाळखोरांवर बसवला कायद्याचा बडगा
जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी विनाकारण उभे राहून विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांवर दामिनी पथकाने नजर ठेवली होती. या मोहिमेअंतर्गत:महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार: एकूण २५१ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

COMMENTS